S M L
  • उपराष्ट्रपती होण्याची जोशी सरांची इच्छा

    Published On: Jun 20, 2012 02:22 PM IST | Updated On: Jun 20, 2012 02:22 PM IST

    20 जूनजर सगळ्यांनी मिळून सहमती दर्शवली तर मला उपराष्ट्रपती होण्यास आवडेल अशी इच्छा शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. कोणतीही इच्छा व्यक्त करायला मला गैर वाटत नाही. पण याबाबत अंतिम निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच घेतील. मात्र सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधीपक्ष एक राहिला असता तर याबाबत काही घडलं असतं मात्र असं काही घडतं नाही असंही खंतही जोशी यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close