S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मंत्रालय नव्या जागी स्थलांतरीत करावे - ए.आर. अंतुले
  • मंत्रालय नव्या जागी स्थलांतरीत करावे - ए.आर. अंतुले

    Published On: Jun 27, 2012 05:40 PM IST | Updated On: Jun 27, 2012 05:40 PM IST

    27 जूनमंत्रालयाला लागलेली आग दुदैर्वी होती पण यातून सावरून संपूर्ण मंत्रालयच नव्या जागी स्थलांतरीत करावं असं मत माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी व्यक्त केलं. पण त्यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स हा पर्याय नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ए. आर. अंतुले यांची आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी खास मुलाखत घेतली. मंत्रालयाच्या हलगर्जीपणामुळे आगीची घटना घडली. पण आता यावरुन एकमेकांवर चिखलफेक करणे अयोग्य आहे. मंत्रालयातून राज्याचा कारभाराचा गाडा हाकला जातो अशा परिस्थिती सरकारने चांगला आदर्श घडवला पाहिजे. मंत्रालयाजवळील पेट्रोलपंप धोकादायक आहे जर या आगीच्या झळा पंपाला पोहचल्या असता तर मोठा अनर्थ झाला असता. सध्याची परिस्थिती धोकादायक आहे सरकारला आत्मपरीक्षणाची गरज आहे असा सल्लाही अंतुले यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close