S M L
  • रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

    Published On: Jun 26, 2012 11:19 AM IST | Updated On: Jun 26, 2012 11:19 AM IST

    26 जूनराजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून मान्यता पावलेले थोर राजे... जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्च नीचतेविरुद्ध बंड पुकारुन सामाजिक समता स्थापन करणारा रयतेचा राजा अशी त्यांची ओळख..अशा या थोर राजाची आज जयंती आहे.शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षी राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी आपली सत्ता आणि शक्ती जनकल्याणासाठी राबवली. शाहू महाराजांनी सत्तेला सेवेचं आणि ध्येयाचं साधन बनवलं. त्यामुळे ते समाजासाठी दिपस्तंभच होते असं इतिहास तज्ज्ञांचं मत आहे.त्यामुळे शाहू महाराजांना जनतेचा सेवक शिपाई किंवा शेतकरी म्हणून घेण्यात सार्थ अभिमान वाटत असे. ते खरे लोकसेवक होते आणि त्याच नात्यानं त्यांनी लोक हितासाठी राज्यकारभार पाहिला. सामान्य माणूस जागा व्हावा आणि त्यांनी आपले हक्क मिळावेत अशी त्यांची इच्छा होती. शिक्षण प्रसार आणि समान संधी हा त्यांच्या राज्यकारभाराचा मुख्य गाभा होता. अशा या राजाला आयबीएन लोकमतचा मानाचा मुजरा..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close