S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मंत्रालयाची जबाबदारी मुंबई फायर ब्रिगेडकडे द्या-भुजबळ
  • मंत्रालयाची जबाबदारी मुंबई फायर ब्रिगेडकडे द्या-भुजबळ

    Published On: Jun 26, 2012 04:50 PM IST | Updated On: Jun 26, 2012 04:50 PM IST

    26 जून मंत्रालयाला लागलेली आग भीषण होती पण यापुढे खबरदारी घेतं आग विझवण्याची जबाबदारी मुंबई फायर ब्रिगेडकडेच द्या अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी कॅबिनेट बैठकीत केली. मंत्रालयाच्या खोली क्र. 411 मध्ये 2.32 मिनिटांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती यावेळी आगीची इशारा देणारी यंत्रणा व्यवस्थित काम करत होती. मात्र लोक बाहेर पडू नयेत, म्हणून मॉक ड्रीलच्या वेळी अलार्मचा आवाज कमी केला होता अशी कबुलीही भुजबळ यांनी दिली. तसेच सातव्या मजल्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची आहे. पीडब्ल्यूडी च्या बजेटला मर्यादा येतात या प्रकरणातून आम्ही धडा शिकलो नाही, लोकांसमोर धडा ठेवला आहे असं सांगत छगन भुजबळांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. आयबीएन लोकमतचे सवाल 1. मॉक ड्रील हा केवळ उपचार म्हणून पार पाडला जातो का ? 2. स्प्रिंकलर्स होते, तर आग वेळेत आटोक्यात का आली नाही ? 3. फायर युनिटसाठी PWDने जादा निधीची मागणी कधी केली होती का ? 4. आगीच्या वेळी घटनास्थळी असलेल्या मंत्रालयातल्या फायर युनिटच्या दोघांची भुजबळांनी अजून भेट का घेतली नाही ? 5. सामान्य प्रशासन विभागाचंं नाव वारंवार घेऊन मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जातंय का ? 6. जबाबदारी संपूर्ण सरकारवर ढकलून भुजबळ स्वतःची सुटका करून घेतायत का ? 7. कोणताही धडा शिकण्यास छगन भुजबळ तयार नाहीत का ?

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close