S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • घाणीच्या साम्राज्यातून मेहतरांची सुटका कधी ?
  • घाणीच्या साम्राज्यातून मेहतरांची सुटका कधी ?

    Published On: Jun 29, 2012 03:54 PM IST | Updated On: Jun 29, 2012 03:54 PM IST

    राजेंद्र हुंजे,पंढरपूर29 जूनकोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असणारं पंढरपूर स्वच्छ ठेवण्याचं मोलाचं काम करणार्‍या मेहतर समाजानं वारीच्या काळातच काम करायला नकार दिला...आणि प्रश्नासनाचे धाबे दणाणले.पंढरपुरात दरवर्षी 4 मोठ्या वार्‍या होतात आणि या निमित्तानं सुमारे एक कोटी भाविकांची इथं वर्दळ असते. पण, शौचालयांची व्यवस्था अपुरी असल्याने प्रचंड घाण पसरते. हे घाणं दूर करण्याचं काम मेहतर समाजाकडून वर्षानुवर्षं करून घेतलं जातं. मानवी विष्ठा हाताने साफ करायला आणि ते डोक्यावर वाहून न्यायला कायद्यानं बंदी आहे. पण, कायदा होऊन 19 वर्षं उलटली तरी मेहतर समाजाची या कामातून सुटका झालेली नाही.आपल्या घरं मिळावीत, नोकर्‍या मिळाव्या, सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी मेहतर समाजाचा संघर्ष सुरू आहे. पण त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज प्रशासनाला वाटली नाही. आता मात्र ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांनी दिलंय.मेहतर समाजाचे प्रश्न सुटले नाहीत तर, सरकारला जाब विचारू, असं विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलंय. 123 वर्षांपासून मेहतर समाजाची ही प्रथा सुरू आहे.स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवणार्‍या मेहतर समाजाला न्याय कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close