S M L
  • येरे येरे पावसा..बेडकांचे लग्न लागले आता..!

    Published On: Jun 30, 2012 01:22 PM IST | Updated On: Jun 30, 2012 01:22 PM IST

    30 जूनवाजंत्री, वर्‍हाडी, नटलेला वर आणि सजलेली वधू... बेडकांच्या आगळ्यावेगळ्या लग्नाचा सोहळा संपन्न झाला नागपुरात. पाऊस पडत नसल्याने बेडकांचे लग्न लावलं की पाऊस पडतो अशी या ग्रामस्थांची श्रद्धा. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बेडकांचे लग्न लावून कन्यादानापासून मंगलाष्टकांपर्यंत सर्व विधींनी हा लग्नसोहळा पार पडला. पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. जून महिना संपत आला तरी हवा तसा पाऊस न आल्याने नागपुरातील विदर्भ किसान समितीच्या कार्यकर्त्यांनी संतोषी माता मंदिरात बेडकांचं लग्न लाऊन वरूणराजाला साकडं घातलं. बेडकाचं लग्न लावले तर वरूण देवता प्रसन्न होत अशी आख्यायिका आहे. त्यामुळे ढोल ताश्याच्या गजरात बेडकाचं लग्न लावण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close