S M L
  • सोहेल खानच्या ड्रायव्हरला जामीन

    Published On: Jul 2, 2012 12:07 PM IST | Updated On: Jul 2, 2012 12:07 PM IST

    02 जूलैअभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या गाडीने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. याप्रकरणी अटक करण्यात आलेला त्याचा ड्रायव्हर धनंजय पिंपळे याला 10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. चंद्रबाला असं मृत्यू झालेल्या 70 वर्षांच्या या महिलेचं नाव आहे. वांद्र्यातल्या मेहबूब स्टुडिओजवळ ही घटना घडलीये. या महिलेला धडक दिल्यानंतर ड्रायव्हर धनंजय पिंपळे गाडीसह पळून गेला. आजूबाजूच्या लोकांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, घटना घडली तेव्हा सोहेल खान गाडीमध्ये होता की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close