S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' बुकचं शानदार प्रकाशन
  • 'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' बुकचं शानदार प्रकाशन

    Published On: Jul 4, 2012 12:12 PM IST | Updated On: Jul 4, 2012 12:12 PM IST

    04 जुलै'बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद' या दैनिक लोकमतच्या कॉफी टेबल बुकचं टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळयाला शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार विजय दर्डा, व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धुत, अभिषेक जयस्वाल, देवेंद्र दर्डा, ऋर्षी दर्डा यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते. मराठवाडयाची राजधानी असलेल्या औरंगाबादची प्रगती झपाटयानं वाढली. शिवाय या विकासामध्ये अनेकांनी योगदान दिले. कठोर मेहनत, धाडसी निर्णय घेऊन प्रगती साधणार्‍या 64 व्यक्तीमत्त्वाची यशोगाथा बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद कॉफी टेबल बुकमधून प्रकाशित करण्यात आली आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत मुलाखती आणि छायाचित्रे यात साकारण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close