S M L
  • चिमुरडीचं अपहरण करणार कॅमेर्‍यात कैद

    Published On: Jul 6, 2012 04:41 PM IST | Updated On: Jul 6, 2012 04:41 PM IST

    06 जुलै10 जूनला सीएसटी स्टेशनवर पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान संगीता या 3 वर्ष वयाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आहे. एका लहान मुलीचं अपहरण झाल्यानं याची गंभीर दखल घेऊन रेल्वे पोलिसांनी तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.या मुलीचं कसं अपहरण झालं यांचं चित्रण स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्ड झालं आहे. आपण पाहातोय या फूटेजमधील अज्ञात व्यक्तीनं कश्या प्रकारे झोपेत असलेल्या संगीताला कडेवर उचलून नेलं. या अज्ञात व्यक्तीचा शोध रेल्वे पोलिसांचं विशेष पथक घेत असून कोणास ही व्यक्ती माहित असेल तर त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close