S M L
  • एका 'इडियट'ने बनवलं खरं हेलिकॉप्टर !

    Published On: Jul 9, 2012 03:52 PM IST | Updated On: Jul 9, 2012 03:52 PM IST

    आसिफ मुरसल, सांगली09 जुलैसांगलीतल्या वांगी गावात जीप आणि ट्रॅक्टर दुरूस्तीचं काम करणार्‍या अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीप मोहिते या तरूणानं कल्पक बुद्धीतून तयार केलेलं हेलिकॉप्टर आता उड्डाणाला सज्ज झालंय. पण त्यापूर्वी त्याने असा पणच केला होता जोपर्यंत हेलिकॉप्टर आकाशात उड्डाण करत नाही तोवर मी लग्न करणार नाही. प्रदीपच्या या जिद्दीनंच त्याला हेलिकॉप्टरचं स्वप्न साकारायला मदत केलीय. जेमतेम दहावीपर्यंतचं शिक्षण आणि उदनिर्वाहाचं साधन म्हणून गॅरेज चालवणार्‍या प्रदीपनं अफलातून कामगिरी केलीय. जगाला काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीनं त्यानं आपल्या गॅरेजमध्ये हेलिकॉप्टर बनवलंय. यामागे प्रेरणा होती थ्री इडियट्स चित्रपटाची...गॅरेजमधून मिळणार्‍या पैशातूनच हळूहळू प्रदीपनं हेलिकॉप्टरसाठी लागणार्‍या साहित्याची जुळवाजुळव केली. लोखंडी पाईप, पत्रा आणि इतर साहित्य खरेदी करून त्यातून हेलिकॉप्टरचा आकार तयार केला. सुरूवातील फॉक्स या तीनचाकी गाडीचं इंजिन त्याला बसवून पाहिलं. पण उपयोग झाला नाही. मग ऍपेचं इंजिन लावल्यावर हेलिकॉप्टर हलू लागलं. असे प्रयोग करत एक दिवस हे हेलिकॉप्टर अखेर जमिनीपासून 4 ते 5 फूट उंच उडालं आणि प्रदीपच्या दोन वर्षाच्या मेहनतीला यश आलं.प्रदीपच्या या कामाला मित्रांनी आर्थिक मदत केली. पण पूर्ण यश मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान हवं आहे. त्यासाठी गरज आहे ती या होतकरू तरूणाच्या पंखांना आर्थिक बळ देण्याची... ते मिळालं तर प्रदीपचं हे हेलिकॉप्टर गगनभरारी घेऊ शकेल.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close