S M L
  • बार्शीचा रमेश एमपीएससीत चमकला

    Published On: Jul 7, 2012 03:56 PM IST | Updated On: Jul 7, 2012 03:56 PM IST

    प्रशांत आवटे, बार्शी07 जुलैमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बार्शीच्या रमेश घोलप याने नवा विक्रम करत इतिहास निर्माण केला आहे. अतिशय खडतर स्थितीत एमपीएससीच्या परिक्षेत रमेश टॉपर आला आहे. त्यांने मिळवलेले हे यश सर्वच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे. बार्शी तालुक्यातीलं आडवणळनावर असलेलं महागाव. तिथं धड शाळा नाही की, अभ्यासाचं वातावरण. अशा वातावरणात प्रशांतनं डीएड करून घराला आधार देत एमपीएससीची तयारी केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये असं रमेशचं मत आहे.10 वीत असतानाच रमेशचं वडिलांचं छत्र हरवलं. रमेशच्या आईचं गावातच बांगड्या भरण्याचा व्यवसाय आहे. आईचा ग्रापंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जोपर्यंत एमपीएससी यश मिळवणार नाही तोपर्यंत गावात येणार नाही असा निश्चय रमेशनं केला होता अशी आठवण रमेशच्या आईनं सांगितलीय.प्रशांतला लहानपनीच पोलिओमुळे अपगंत्व आलं, मात्र प्रचंड इच्छाशक्ती आणि कठिण परिश्रम कऱण्याची तयारी असली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही हेच रमेशनं आपल्या यशातून दाखवून दिलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close