S M L
  • बॉलीवुडचा 'डर्टी पिक्चर'

    Published On: Jul 10, 2012 03:34 PM IST | Updated On: Jul 10, 2012 03:34 PM IST

    10 जुलैबॉलीवुडच्या चंदेरी दुनियेच्या काळा अंधारात होत असलेल्या काळ्या कारभाराचा कोब्रा पोस्ट आणि आयबीएन नेटवर्कने पर्दाफाश केला आहे. बॉलीवुडमध्ये अनेक सिनेमात ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा धंदा राजरोसपणे सुरु असल्याचं उघड झालं आहे. हा पैसा कोटीच्या घरातला पण व्यवहार होतोय फक्त लाखांच्या घरात..एवढंच नाहीतर फक्त 25 टक्के पैसा हा व्हाईट वापरला जातो आणि बाकीचा 75 टक्के पैसा हा ब्लॅक मनी वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याही पेक्षा ज्यांच्या चित्रपटांचे तोंडभरून आपण कौतुक केले असे दिग्दर्शक निर्माते या धंद्यात आपल्या तुंबड्या भरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाशू भगनानी, अनीस बझमी, अनुभव सिन्हा, राजीव कौल कॅमेर्‍यात कैद झाले आहे.हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला प्रसिध्द निर्माता, वाशू भागनानी... कुली नं. 1, बडे मियाँ छोटे मियाँ, डू नॉट डिस्टर्ब आणि फालतू या सिनेमांची निर्मिती वाशू भागनानीने केली आहे. पण या सिनेमांमध्ये पैसा गुंतवणारे कोण आहेत आणि त्याबदल्यात वाशूने त्यांना कोणते वायदे केले ? आमचे अंडरकव्हर रिपोर्टर वाशू भगनानींना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले आणि भगनानीने दाखवलं काळा पैसा पांढरा करण्याचं बॉलीवूडचं डर्टी पिक्चर...त्यांच्यात झालेला हा संवाद वाशू - काळा पैसा पांढरा करण्याचे मला अनेक मार्ग माहिती आहेत...पण पैसे गुंतवणारा माणूस विश्वासाचा पाहिजे, इन्कमटॅक्सच्या जाळ्यात आपण अडकता कामा नयेरिपोर्टर - मग जर आम्हाला 10 कोटी गुंतवायचे असतील, तर मग चेकमध्ये किती आणि कॅशमध्ये किती असतील ?वाशू - आठ कोटी कॅश आणि 2 कोटी चेकमध्ये... कागदावर फक्त दोन कोटीचा व्यवहार असेलरिपोर्टर - ठीक आहे, मग आम्ही करार करण्यासाठी एक कंपनी तयार करतोवाशू - मग गेल्या 50-60 वर्ष सुरु असलेल्या पध्दतीप्रमाणे आपल्याला एक करार करावा लागेल, तुमचे पैसे वसूल झाल्यावर जो नफा होईल त्यात आपला वाटा असेल 50-50...आणि तुमचे पैसे तुम्हाला चेकमध्ये मिळेल. सिनेमा रिलीज झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, तुम्ही मला कॅश देऊ शकता, कागदोपत्री व्यवहाराची गरज नाही आणि तुम्हीसुध्दा सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर असालं.या अशा डीलमध्ये फायनान्सर आणि निर्माते अशा दोघांचाही फायदा आहे, फिल्म डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून फायनान्सरचा काळा पैसा पांढरा होतो, आणि निर्मात्याला सिनेमा बनवायला पैसे मिळतात आणि नफा झालाच तर त्यातला वाटाही मिळतो.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close