S M L

ठाण्यातील सोनाळे गावचे बाल वैज्ञानिक ...

प्रीती खान 17 डिसेंबर, ठाणे गेल्या 16 वर्षांपासून नॅशनल चिल्डर्न सायन्स काँग्रेस शाळांमधून विज्ञान स्पर्धा घेते. यावर्षी ठाणे जिल्ह्यातील सोनाळे या गावातील मुलांनी बाजी मारली. या गावातला निर्गुण हा विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नागालँडला जाणार आहे. सोनाळे गावातील उत्साही मुलांनी प्लॉस्टिकच्या बाटल्या, पेन, पेन्सिल, पुठ्ठा आणि पाच सुपर ब्राईटच्या साहाय्यानं प्रयोगशाळा तयार केली आहे. वेधशाळेच्या प्रोजेक्टची निवड नॅशनल चिर्ल्डन सायन्स काँग्रेस परिषदेच्या अंतिम फेरीसाठी झालीय. ' प्रयोगशाळेसाठी लागणारी साहित्य उपलब्ध नव्हती तसंच ती परवडणारी नव्हती, म्हणून आम्ही ती पर्यायी पद्धतीनं बनवायची ठरवली ', असं शाळेतील शिक्षक निलेश निमकर यांनी सांगितलं. पर्जन्यमापक आणि वायूवेधमापक ही या विद्यार्थ्यांनी बनवली आहेत. ' आम्ही उघड्या जागेवर पाच पर्जन्यमापकं दिशांना ठेवून नियमित दोन वेळा त्याच्या नोंदी घेऊ लागलो. त्यातील पश्चिमेकडची पाच पर्जन्यमापक हरवली. ती आम्ही पुन्हा बनवली आणि पाऊस कितीही जोरात असला तरी आम्ही घरातून पळुन जाऊन नोंदी घेत होतो ' असं बाल वैज्ञानिक तेजल राऊतनं सांगितलं. या मुलांनी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता चार महिने गावातील पावसाच्या नोंदी घेतल्या. त्याचे आलेख काढले. सरासरी पावसाची गणितं सोडवली आणि मग आपल्या गावातील पिकंावर त्याचा होणारा परिणाम शोधला. विज्ञान प्रोजेक्टमुळे खर्‍या अर्थानं विज्ञानाच्या रुक्ष धड्यांना या मुलांनी पुस्तकाबाहेर खेचलंय आणि वैज्ञानिक बनण्याचा प्रवास सुरु केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2008 11:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2008 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close