S M L
  • आजपासून टोल भरु नका - राज

    Published On: Jul 24, 2012 09:33 AM IST | Updated On: Jul 24, 2012 09:33 AM IST

    24 जुलैराज्यात टोलवसुलीच्या नावाखाली जनतेची लूट सुरू आहे. आजपर्यंत टोल किती वसुल केला गेला,त्याचा वापर कुठे झाला, यांचा खुलासा सरकारने द्यावा त्यामुळे जोपर्यंत सरकार टोलवसुलीत पारदर्शकता आणत नाही तोपर्यंत आजपासून जनतेनं टोल भरु नये असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. मनसेनं सलग 15 दिवस राज्यातील विविध टोलनाक्यांवर सर्व्हे करुन रोज किती टोलवसुली केली जाते याचा अभ्यास केला. या सर्व्हेतून कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत त्याची माहिती आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली. लोकांनी टोल भरु नये आणि टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी जर जबरदस्ती करण्यात आली तर प्रत्येक टोलनाक्यावर मनसे कार्यकर्ते पहारा द्यायला असतील असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मी टोल, टॅक्सविरोधात नाही पण सरकारने टोल नाक्याच्या आड जो काही जनतेकडून पैसा घेतला आहे तो कुठे खर्च झाला याची तपशील द्यावी. आम्हाला कोणताही संघर्ष करायचा नाही आणि करण्याची इच्छाही नाही वेळ आली तरी कमीही पडणार नाही असं आव्हानही राज यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close