S M L
  • पोलिसांच्या साक्षीने अशीही टोलवाटोलवी

    Published On: Jul 26, 2012 02:57 PM IST | Updated On: Jul 26, 2012 02:57 PM IST

    26 जुलैराज्यात टोलच्या नावाखाली जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल न भरण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात टोलवसुली सुरू आहे. पण औरंगाबादमधल्या जळगाव रस्त्यावर हर्सुल टोलनाक्यावर जनतेची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. या टोलनाक्यावर आमची टीम पोहोचली तेव्हा इथं अनेक गाड्यांना पावती न देता फक्त पैसे घेऊन जाऊ दिलं जात असल्याचं दिसलं. जळगाव रस्त्यावर असलेल्या या टोलनाक्यावर चारचाकी वाहनांसाठी 20 रुपये इतका टोल आकारला जातो. पण, त्याठिकाणी 5 आणि 10 रुपये घेऊन पावती न देताच गाडया सोडल्या जात आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या साक्षीनंच हा प्रकार सुरू आहे.याबाबत आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close