S M L
  • एका गावाची इंग्रजी शिकण्याची गोष्ट !

    Published On: Aug 16, 2012 12:07 PM IST | Updated On: Aug 16, 2012 12:07 PM IST

    मनोज जयस्वाल, वाशिम16 ऑगस्टशाळेत असताना सर्वात जास्त भीती कुठल्या विषयीची वाटते ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला तर एक उत्तर हमखास येईल आणि ते म्हणजे इंग्रजीचं. पण वाशिम जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या एका खेड्यातल्या शाळेत एक शिक्षक, विद्यार्थी आणि गावकर्‍यांचं इंग्रजीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतोय. धडपडणार्‍या शिक्षकाची ही अनोखी कहाणी...वनोजा... वाशिम जिल्ह्यातलं अडवळणाचं गावं. गावातलं हे शिवाजी हायस्कूल. पण मुलांची संख्या मोजकीच. शिक्षक रावसाहेब बोचे यांनी याचं कारण शोधलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, मुलांना इंग्रजीची भीती वाटतेय. आणि इथंच सुरू झाली एका अनोख्या उपक्रमाची सुरवात.` व्हिलेज गो टू स्कूल `.या उपक्रमामुळे गावाचं रूपचं बदललं. गावातल्या सर्व भींतींवर इंग्रजीचे साधे, सोपेे चार्ट लिहिले गेले.त्यामुळे विद्यार्थ्यांची भीती दूर झाली आणि जुळलं इंग्रजीशी मैत्रीचं नातं.मुलांना इंग्रजीची गोडी लागल्याने आता पालकही खूष आहेत. अडचणींच्या तक्रारीचा पाढा न वाचता विद्यार्थी आणि सर्व गावाच्या सहकार्याने रावसाहेब या शिक्षकाने सुरू केलेला इंग्रजीशी नातं जोडणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close