S M L
  • कल्याणमध्ये कासवाची 300 पिल्लं सापडली

    Published On: Aug 18, 2012 02:32 PM IST | Updated On: Aug 18, 2012 02:32 PM IST

    18 ऑगस्टकल्याणमध्ये दुर्मिळ जातीची तब्बल 300 कासवाची पिल्लं सापडली. एसटी डेपोत सकाळी एका बेवारस बॅगेत ही पिल्ल सापडली. सकाळी काही प्रवाशांनी ही बेवारस बॅग पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. जवळच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले बॅग खोलून बघताचं 300 पिलं आढळली. पोलिसांनी ही पिल्लं ताब्यात घेवून काळू नदीत सोडली. या पुर्वीही कल्याणध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्मिळ पिल्लं सापडण्याचा घटना समोर आल्या आहे. या पिल्लांचा वापर काळ्या जादूसाठी केला जातो असं पोलीस तपासाच पुढं आलंय. पोलीस आता पुढचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close