S M L

दहशतवाद्यांनीच केली करकरेंची हत्या : गृहमंत्री

18 डिसेंबर, नागपूरकरकरेंची हत्या, दहशतवाद्यांनीच केली असा खुलासा गृहमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तर त्यांच्या मृत्यूची चौकशीची गरज नसल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. हेमंत करकरे यांचा मृत्यू नक्की दहशतवादी हल्ल्यातच झाला का ? त्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. त्याचेच पडसाद आज विधानसभेतही उमटले. विधानसभेत झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. असा प्रश्न ए. आर. अंतुले यांनी बुधवारी विचारला होता. एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. त्यामुळे गृहमंत्री जयंत पाटील यांनी हा खुलासा केला. अंतुले यांच्या विधानावर प्रचंड आक्रमक होत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. स्थगन प्रस्तावाद्वारे या विषयावर चर्चा व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. मात्र दहशतवादाच्या मुद्द्यावरील चर्चा कालच संपल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं. यामुळे आणखीनच संतापलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसदेत गोंधळ घालायला सुरुवात केली आणि विधानसभेच काम तहकूब करावं लागलं. "संसदेत सत्ताधारी पक्षाचा एखादा सदस्य जेव्हा मत मांडतो, तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत नसते. सरकारचा प्रतिनिधी म्हणून तो विधान करतो"असं स्पष्ट करतअंतुलेंवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली. करकरेंच्या मृत्यूचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला होता. पोस्ट मार्टेम रिपोर्ट आणि पोलीस पंचनामा याच्या आधारे बनवलेल्या अहवालात करकरे दहशतवादी हल्ल्यातच शहीद झाल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. त्यामुळच अंतुले हे अल्पसंख्यांकांची वोट बँक डेळ्यासमोर ठेऊन असे विधान केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2008 06:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2008 06:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close