S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राज यांना फूल देऊन पोलीस हवालदाराने मानले आभार
  • राज यांना फूल देऊन पोलीस हवालदाराने मानले आभार

    Published On: Aug 21, 2012 01:06 PM IST | Updated On: Aug 21, 2012 01:06 PM IST

    21 ऑगस्टराज ठाकरेंच्या सभेला पोलीस दलातल्या अनेकांचा मनोमन पाठिंबा होता. राज ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर प्रमोद तावडे या पोलीस शिपायाने राज ठाकरेंना फूल दिलं. महाराष्ट्र पोलिसांची यूनियन नाही. पण राज ठाकरे आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे त्यांना फूल दिल्याचं प्रमोद तावडेंनी सांगितलंय. तावडे यांना ऑगस्ट 2010 साली सीआयएसएफ (CISF)च्या काही जवानांनी बेदम मारहाण केली होती. पण या प्रकरणात त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. राज ठाकरेंना फूल दिल्यानंतर आपल्यावर कारवाई होईल, याची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचंही तावडेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close