S M L
  • उद्धव यांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक

    Published On: Aug 23, 2012 12:20 PM IST | Updated On: Aug 23, 2012 12:20 PM IST

    23 ऑगस्टमंगळवारी निघालेल्या राज ठाकरे यांच्या मोर्चा सारखे आणखी मोर्चे निघावे यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा असं सांगत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची पाठ थोपटली. पण राज ठाकरेंच्या मोर्चाऐवजी 11 ऑगस्टसारख्या मोर्च्यांविषयी काळजी करण्याची गरज आहे. तसेच सर्वच पक्षांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवला पाहिजे असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. मनसेच्या पहिल्याच विराट मोर्चाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याची दखल घेत शिवसेनेचे मुखपत्र सामनामधूनही मनसेच्या मोर्च्याची स्तुती करण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं आज कौतुक केल्यानं दोन्ही भावांमध्ये वाढत्या जवळकीबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close