S M L
  • राज ठाकरेंकडून बाबासाहेबांचा अवमान - आठवले

    Published On: Aug 24, 2012 04:33 PM IST | Updated On: Aug 24, 2012 04:33 PM IST

    24 ऑगस्टरिपब्लिकन पार्टीने या अगोदर महागाईविरोधात मोर्चा,दुष्काळासंदर्भात आंदोलन केली होती मात्र राज यांनाही लक्षात नाही ते खोटे बोलत असून इंदू मिलसंदर्भात बोलून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ते अवमान करत आहे असं प्रतिउत्तर रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी राज यांनी दिले. मुबंईत मनसेनं मंगळवारी काढलेल्या मोर्चात राज ठाकरे यांनी रिपब्लिकन नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात राज ठाकरे यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. आपण आपल्याविधानावर ठाम आहोत असं सांगत पुन्हा एकदा दलित नेत्यांना खडेबोल राज यांनी सुनावले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close