S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • खाण वाटपाचा महसूल काँग्रेसच्या तिजोरीत गेला - सुषमा स्वराज
  • खाण वाटपाचा महसूल काँग्रेसच्या तिजोरीत गेला - सुषमा स्वराज

    Published On: Aug 27, 2012 02:01 PM IST | Updated On: Aug 27, 2012 02:01 PM IST

    27 ऑगस्टकोळसा खाणवाटप घोटाळ्यासाठी थेट पंतप्रधान मनमोहन सिंग जबाबदार आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. खाणवाटपात मिळालेला महसूल काँग्रेसच्या तिजोरीत गेल्याचा आरोप भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी केला. 142 खाणींचे वाटप रद्द करावे आणि नव्याने निविदा काढाव्यात असं भाजपनं म्हटलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निवेदन अयोग्य आणि घटनात्मक संस्थांवर प्रहार करणारं आहे. पंतप्रधानांनी कॅगवर टीका करायला नको होती, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. एनडीएतल्या इतर पक्षांचा पाठिंबा मिळाला नाही तरी भाजप आपली लढाई सुरूच ठेवणार असल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close