S M L
  • आंघोळ केलेलं पाणीही साठवून वापरावे लागते

    Published On: Aug 27, 2012 11:41 AM IST | Updated On: Aug 27, 2012 11:41 AM IST

    28 ऑगस्टमराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न कसा गंभीर बनलाय याचं दाहक चित्र आता समोर आलंय. पिण्यासाठीच पाणी मिळत नाही तर अंघोळ करण्यासाठी पाणी कसे मिळेल याची चिंता गावकर्‍यांना लागली आहे. आणि त्याचमुळे आंघोळ केलेलं पाणी कपडे धुणे आणि इतर वापरासाठी ठेवलं जातंय. औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड तालुक्यातल्या अंधारी गावातलं हे वास्तव पाणीटंचाई किती गंभीर आहे हे दाखवून देतंय. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. पण या यादीत मराठवाड्यातील 33 तालुक्यांचाच समावेश आहे. मात्र मराठवाड्यातील एकूण 67 तालुक्यांमध्ये गंभीर स्थिती आहे. 50-75 टक्यांपेक्षा कमी पाऊस असलेल्या 34 तालुक्यांना मात्र या यादीतून वगळण्यात आलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close