S M L
  • दिग्विजय म्हणाले, ठाकरे हे बिहारचे !

    Published On: Sep 1, 2012 04:45 PM IST | Updated On: Sep 1, 2012 04:45 PM IST

    01 सप्टेंबरराज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे बिहारचे राहणारे आहे. त्यांनी बिहार सोडून धार येथे राहिले त्यानंतर ते मुंबईला आले आणि स्थाईक झाले असा अजब-गजब तर्क काँग्रेसचे 'वादग्रस्त'सरचिटणीस दिग्विजय सिंग केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शुक्रवारी 11 ऑगस्टच्या हिंसाचारप्रकरणी बिहारी लोकांना घुसखोर समजून हाकलून लावू असा इशारा दिला होता. राज यांच्या वक्तव्याचा बिहारी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्रविरोध करत एकच हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी थेट वेगळाच तर्क काढला आहे म्हणे, राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे बिहारचे आहे. बिहार येथून ते पुढे धार येथे गेले आणि त्यानंतर ते मुंबईत स्थाईक झाले. मुंबईचे खरे मराठी तर तेथील कोळी समाज हा आहे. राज यांनी सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांच्या विरोधात जे काही विधान केले आहे त्यांनी त्याबद्दल त्यांची माफी मागावी अशी मागणीही दिग्विजय सिंग यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close