S M L
  • हिंदी चॅनेल्सना संरक्षण देऊ - आठवले

    Published On: Sep 3, 2012 11:42 AM IST | Updated On: Sep 3, 2012 11:42 AM IST

    03 सप्टेंबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदी चॅनेल्सवाल्याना धमकावणं चुकीचं असल्याचं मत आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांनी मुंबई हिंसाचारानंतर काढलेल्या मोर्चात इंदू मिलसंदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे आरपीआयने आपली नाराजी जाहीरपणे मांडली होती आणि त्यानंतर आता हिंदी चॅनेल्सना धमकावण्याच्या राज ठाकरे यांच्या इशा-याचाही आरपीआयने निषेध केलेला आहे. जर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी चॅनल्सवाल्यांना काही इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला तर आरपीआय कार्यकर्तेचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरतील आम्ही हिंदी चॅनेल्सवाल्यांना संरक्षण देऊ असं आश्वासनही यावेळी रामदास आठवलेंनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close