S M L
  • गॅस टँकरची गळती

    Published On: Sep 6, 2012 08:45 AM IST | Updated On: Sep 6, 2012 08:45 AM IST

    06 सप्टेंबरमुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅस टँकर आणि टेम्पोची धडक झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गॅस टँकरमधून गॅसची गळती होत असल्याने एक्सप्रेस हायवे आणि जुना मुंबई-पुणे हायवे बंद करण्यात आला आहे. टँकरमध्ये एलपीजी गॅस होता. या गॅसची गळती सुरू झाल्याने खंडाळ्याजवळ दोन्ही हायवे एकत्र येत असल्याने दोन्ही मार्गांवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खंडाळा परिसरात अपघाताच्या स्थळापासून जास्तीत जास्त दूर जावे असं आवाहन आयआरबीचे केलं आहे. जुन्या एक्सप्रेस वेवर आता वाहतूक धीम्या गतीनं सुरू झालीय. सर्व वाहतूक सुरळीत व्हायला 6 तास लागण्याची शक्यता आहे. खंडाळा गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात. लोकांनी घरात विद्युत उपकरणे आणि गॅसचा वापर करू नये, असं आवाहनही करण्यात आलंय. गावातल्या शाळेलाही सुट्टी देण्यात आलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close