S M L
  • आशाताईंची मोठ्या पडद्यावर एंट्री

    Published On: Sep 6, 2012 02:20 PM IST | Updated On: Sep 6, 2012 02:20 PM IST

    06 सप्टेंबरगेल्या अनेक दशकांपासून अवीट आवाजाने चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या सुप्रसिध्द गायिका आशा भोसले वयाच्या 80 व्या वर्षी आता चित्रपटात कलाकार या नात्याने मोठ्या पडद्यावर येणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरला आशाताई 'माई' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री करणार आहे. या चित्रपटात आशाताई एका आईची भूमिका करणार आहे तर त्यांच्या मुलीची भूमिका अभिनेत्री पद्मनी कोल्हापूरे निभावणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close