S M L
  • अँमस्टरडॅम जहाजाची आग आटोक्यात

    Published On: Sep 10, 2012 03:04 PM IST | Updated On: Sep 10, 2012 03:04 PM IST

    10 सप्टेंबरमुंबईच्या समुद्रकिनार्‍याजवळ एमव्ही ऍमस्टरडॅम ब्रिज या जहाजाला लागलेली आग 12 तासांनंतर आटोक्यात आली आहे. पण अजूनही धूर येतोय. या जहाजावरील सर्व कर्मचारी सुखरुप आहेत. कोस्टगार्डचं आग विझवण्याचं काम रात्रभर सुरू होतं. जहाजावरच्या ज्वलनशील रासायनिक पदार्थांमुळे काल संध्याकाळी ही लागली होती. कोस्टगार्डच्या दोन जहाजांच्या मदतीने ही आग विझवण्याचं काम सुरू आहे. हे जहाज कोलंबोहून मुंबईकडे येत होतं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close