S M L
  • श्रीमंत जीएसबी गणपतीचं मुखदर्शन

    Published On: Sep 17, 2012 04:41 PM IST | Updated On: Sep 17, 2012 04:41 PM IST

    17 सप्टेंबरमुंबईतला सर्वात देखणा आणि श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख आहे. या गणपतीवर चढवले जाणारे दागिने अगदी नेत्रदिपक असतात. आज या गणपतीवर साज चढवण्यात आला. हा गणेशोत्साव 5 दिवसांचा असतो. यावर्षीचं वैशिष्ठ्य म्हणजे या गणेशमूर्तीवर 70 किलो सोन्याचे दागिने आणि 470 किलो चांदीचे दागिने सजवण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत 21 कोटी 50 लाख रूपये आहे. 5 दिवसांच्या या गणेशोत्सवात हजारो गणेशभक्त या गणेशाचं दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. सुरक्षेसाठी जीएसबी मंडळाने मंडपात 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत . तसेच 450 सिक्युरीटी गार्डस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close