S M L
  • मुलांसह कुटुंबावरही 'कुपोषणा'ची वेळ

    Published On: Sep 18, 2012 04:20 PM IST | Updated On: Sep 18, 2012 04:20 PM IST

    अलका धुपकर, बुलडाणा18 सप्टेंबरबुलडाण्यातल्या दुर्गम भागातलं कुपोषण आयबीएन लोकमत उघड करतंय. कुपोषित मुलांसाठी सरकार विविध योजना राबवतं. एकात्मिक बालविकास प्रकल्पापासून ते राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेपर्यंतचा निधी हा कुपोषित मुलांची प्रकृती सुधारावी, यासाठी दिला जातो. पण, या मुलांची प्रकृती काही सुधारत नाही. कुपोषित मुलांचा प्रश्न हा फक्त भुकेशी निगडित नाही. तर, या दुर्गम भागांतल्या अनेक समस्यांमुळे इथंल कुपोषण वाढतं आहे. बुलडाण्यातल्या आदिवासी भागात कुपोषित मुलांची अवस्था कॅमेर्‍यामध्ये टिपतआमची टीम घरांघरांतून फिरली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की, कुपोषित मुलांची आई देखील अशक्त आहे. बालविवाहाची प्रथा आणि कुटुंबनियोजनाचा अभाव यामुळे जन्माला आलेलं प्रत्येक मूल सुदृढ असतंच असं नाही.एकेकाला किती मुलं असतात ? उत्तर- आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. मुलाचं वय तर सोडाच..स्वत:चं वयही अनेकांना माहित नाहीय...कारण, या कधी शाळेतच गेल्या नाहीत. सरकार सात वर्षांपर्यंतच्या कुपोषित मुलांची नोंद ठेवतं. पण इथं आम्ही ज्योतीबाई ला भेटलो...12 वर्षांची ज्योतीबाई ना चालू शकते..ना बोलू शकते..कुपोषणामुळे तिची प्रतिकारशक्ती इतकी क मी झालेय की, अनेक आजारांनी ती आता ग्रस्त बनलेय. गरिबीचं एवढी आहे की, अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहार कुपोषित मुलाऐवजी कुटुंबाच्या पोटात जातोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close