S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पुण्यातील मानाच्या गणपती भक्तीभावाने स्वागत
  • पुण्यातील मानाच्या गणपती भक्तीभावाने स्वागत

    Published On: Sep 19, 2012 07:36 AM IST | Updated On: Sep 19, 2012 07:36 AM IST

    19 सप्टेंबरमहाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन झालं. पुण्यातील मानाच्या गणपतींची मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली. मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत असणार्‍या कसबा गणपतीची पारंपारिक पद्धतीने मिरवणुक काढण्यात आली. ढोल, लेझिम पथकाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.तर मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी. पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना आज दुपारी झाली. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांच आगमन झालं. कार्यकर्त्यांच्या मोरया मोरयाच्या गजरात बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा चौथा गणपती म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळशीबाग गणपतीची साग्रसंगीत पुजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच पुण्यातील मानाचा 5 वा गणपती म्हणजे केसरी वाड्याचा गणपती.आज या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांचे वारस रोहीत टिळक आणि त्यांच्या कुटुंबींयानी मोठ्या उत्साहाने विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना केली. सकाळी पारंपरिक पद्दतीने पालखीतून गणेशाची मूर्ती टिळक वाड्यात आणण्यात आली. मानाच्या 5 गणपतींपैकी या गणपतीचं पुणेकरांना विशेष महत्व आहे. टिळकांनी गणेशत्सोवाला खर्‍या अर्थाने सुरवात केली होती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close