S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गणेश निधी : किशोरी शक्ती योजनेला हवा मदतीचा हात
  • गणेश निधी : किशोरी शक्ती योजनेला हवा मदतीचा हात

    Published On: Sep 21, 2012 02:28 PM IST | Updated On: Sep 21, 2012 02:28 PM IST

    दिनेश केळुसकर, रत्नागिरी.21 सप्टेंबरसक्षम आणि सबल स्त्री चा पाया घातला जातो तो तिच्या किशोरी अवस्थेत. पण कोकणातल्या कुणबी समाजातल्या शेकडो किशोरवयीन मुली वजन, उंची, आणि हिमोग्लोबीन ने कुपोषित आहेत. आणि म्हणूनच विठ्ठलराव जोशी चॅरीटेबल ट्रस्टच्या वालावलकर रुग्णालयाकडून आता एकेक गाव तीन महिन्यांसाठी दत्तक घेतलं जाऊ लागलंय.डेरवणच्या वालावलकर रुग्णालयाची टीम कोकणातल्या अशा एखाद्या खेड्यात पोहोचते. काम असतं मुलींच्या आरोग्य सर्वेक्षणाचं. गुहागर मधल्या शिर गावातल्या शारदा भुवड यांच्या पदरात सहा मुली. दोन मुली शिक्षण अर्ध्यावर सोडून घरकामासाठी मुंबईकडे गेल्या आहे. आणि उरलेल्या गरिबी आणि आरोग्यविषयक अज्ञानामुळे अजूनही कुपोषित आहेत. या सर्वेमध्ये किशोरवयीन मुलींच्या कुपोषणाचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. किशोरी शक्ती योजनेच्या प्रमुख अश्विनी चव्हाण म्हणतात, 11 ते 20 वर्षे वयोगटातल्या 215 किशोरवयीन मुलींचा आम्ही सर्व्हे केला आणि या सर्व्हेमध्ये आम्हाला आसं आढळून आलय की 70 ते 80 टक्के मुली मालनरीश म्हणजे कुपोषित आहेत . त्यांचं वजन अतिशय कमी आहे. रक्तातलं हिमोग्लोबीनचं प्रमाणही कमी आहे.यावर उपाय म्हणून या रुग्णालयाने शिर गाव दत्तक घेऊन किशोरी शक्ति योजना तयार केली. गेले तीन महिन्यांपासून या मुलींना पुरक सकस आहार, व्यायाम आणि स्त्री आरोग्यविषयक माहिती आणि प्रशिक्षण दिलं जातंय.सहाय्यक स्नेहल डिके म्हणते, ही जी किशोरी अवस्था आहे कारण ह्यातनच पुढे जाऊन त्या एक प्रौढ व्यक्ती बनणार आहेत. हा जो त्यांचा प्रवास आहे तो सुकर व्हावा आणि एक उत्तम गृहिणी किंवा व्यक्ती म्हणून त्यांचा विकास व्हावा त्यासाठी आरोग्य शिक्षण आहे, मानसिक बदल कसे केले पाहिजेत. ह्याचा उपयोग त्यांच्या शरीरासाठी आणि बुध्दी साठी कसा होऊ शकतो ह्याची आपण माहिती त्यांना देत आहोत.वैद्यकीय अधिकारी अश्विनी पत्की-नरवणे म्हणतात, घरामध्ये मुलींचं प्रमाण जास्त. त्यामुळे उत्पन्नाच्या मानाने खाणारी तोंडं जास्त आहेत. त्यामुळे वैविध्य जे खाण्यामध्ये शहरात बघायला मिळतं ते ह्यांना नाही मिळू शकत.या 215 मुलींमध्ये तीन महिन्यानंतर आता सकारात्मक बदल घडून येताना दिसत आहे. पण आशेचा हा दीप तेवत ठेवण्यासाठी गरज आहे ती अशी योजना कायम स्वरुपी राबवणारी यंत्रणा गावातच उभी राहण्याची .या संस्थेला मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता. ही मदत आर्थिक स्वरुपात करा किंवा योजनेतलं एखादं दत्तक गाव किंवा मुलींसाठीचा खर्च उचला. संपर्क करा'विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट'चेबी.की.एल.वालावलकर हॉस्पिटलडायग्नोसिस आणि रिसर्च सेंटरमुक्काम पोस्ट- सावर्डेतालुका-चिपळूणजिल्हा- रत्नागिरीफोन नंबर- 02355-264149

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close