S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मसापचा अजब कारभार, अनंत भालेरावांचा पडला विसर
  • मसापचा अजब कारभार, अनंत भालेरावांचा पडला विसर

    Published On: Sep 25, 2012 11:18 AM IST | Updated On: Sep 25, 2012 11:18 AM IST

    25 सप्टेंबरऔरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेला नावारुपाला आणणारे पत्रकार अनंत भालेराव यांचा मराठवाडा साहित्य परिषदेला विसर पडलाय. 1992 ते 93 या काळात 25 लाख रुपये खर्च करुन शहरातील सन्मित्र कॉलनीमध्ये मसापची इमारत उभी करण्यात आली होती. मराठवाडा साहित्य परिषदेच्या इमारतीला अनंत भालेराव भवन असं नावही देण्यात आलं होतं. पण गेल्या वर्षभरापासून हे नावच पुसुन टाकण्यात आलंय. या संदर्भात अनंत भालेराव यांच्या मुलगी डॉ.सविता पानट यांनी मसापचे अध्यक्ष डॉ.कौतीकराव ठाले-पाटील यांना विचारणा केली. पण नाव असल्याचा पुरावा द्या, असं उद्दाम उत्तर देऊन ठाले-पाटलांनी नवीन वाद सुरु केला. ठाले पाटलांनी अनंतराव भालेराव यांच नाव असल्याचा पुरावा मागितला. आमच्या हाती आलेल्या पुराव्यानुसार मसापच्या सभागृहाला अनंतराव भालेवांचं नाव होतं. अनंत भालेराव यांचंच नाव या इमारतीला असल्याचं उघड झाल्यानंतर आम्ही विसरलो अशी कबुली मसापचे कार्यवाहक के एस अतकरे यांनी ही कबुली दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close