S M L
  • अजित पवारांची राजीनाम्याची घोषणा

    Published On: Sep 25, 2012 12:24 PM IST | Updated On: Sep 25, 2012 12:24 PM IST

    25 सप्टेंबर'जलसिंचन प्रकल्पावर किती तरतूद झाली, भूसंपादसाठी किती खर्च झाला, श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर ठेवण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. महिनोंमहिने फाईली मंत्रालयात ठेवणं मला योग्य वाटत नाही. आलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेणं ही माझ्या कामाची पध्दत आहे. यावर टीका होणं याच्याशी मी सहमत नाही. या प्रकरणाची पूर्ण पाहणी, विलंबाची आणि अधिक खर्चाची मिमांसा करता यावी म्हणून मी उमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठींकडे कळवले आहे आणि माझ्या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी सहमती दर्शवली आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवलेला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी,शासकीय अधिकार्‍यांनी मला उत्तम सहकार्य दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसेच राज्यातील जनतेसाठी राष्ट्रवादीचा आणि माझा अहोरात्र प्रयत्न राहील हा विश्वास सर्वांना देतो व यासाठी जनतेची साथ मिळेल असा विश्वास बाळगतो.' अजित पवार

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close