S M L
  • 'अजितदादा तुम आगे बढो..'

    Published On: Sep 26, 2012 10:56 AM IST | Updated On: Sep 26, 2012 10:56 AM IST

    26 सप्टेंबर'अजित पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है','अजितदादा एकच वादा' अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. आज राष्ट्रवादी विधिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर बाहेर राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यात महिलांच्या लक्षणीय सहभाग होता. अजितदादांची गाडी आली तेव्हा कार्यकर्त्यांनी गाडीभोवती एकच गराडा घातला. घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close