S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • महाराष्ट्राचं 'वॉटरगेट'उघडकीस आणणारे 'विजय' पांढरे !
  • महाराष्ट्राचं 'वॉटरगेट'उघडकीस आणणारे 'विजय' पांढरे !

    Published On: Sep 26, 2012 04:17 PM IST | Updated On: Sep 26, 2012 04:17 PM IST

    दीप्ती राऊत,नाशिक26 सप्टेंबरअजित पवारांसारख्या रांगड्या नेत्याच्या राजीनाम्याला अप्रत्यक्ष कारणीभूत ठरलेले विजय पांढरे हे नाव सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलंय. त्यांना मनोरुग्ण ठरवण्यात आलं. पण कोण आहेत पांढरे ? पांढरेंना मनोरुग्ण ठरवण्यामागचं काय आहे राजकारण ? त्यांना भीती का नाही वाटत, त्यांच्या नेमक्या प्रेरणा काय आणि त्यामागचे विचार काय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...सिंचन प्रकल्पांमधल्या कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती देणारं पत्र विजय पांढरेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहीलं आणि एकच गजहब झाला. पण पांढरेंसाठी हा अनुभव नवीन नाही. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या पहूर गावचे पांढरे ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जलसिंचन खात्यात कामाला लागले. गेल्या 30 वर्षांच्या या सरकारी नोकरीत त्यांनी त्यांचं काम सचोटीनं आणि निडरपणे केलं.माझ्या मनात अशी भिती कधीच आली नाही असं विजय पांढरे म्हणता.तत्त्वज्ञान आणि अध्यत्म हे त्यांच्या विचारांचं आणि कृतीचं अधिष्ठान..प्रत्येक व्यक्तीच्या आत एक शक्ती असते... मनाचा तो स्तर जिथे कोणतीही मागणी नसते... भय नसतं असं पांढरे म्हणता.मात्र, या प्रामाणिकपणाबद्दल पांढरेंना बरीच किंमत चुकवावी लागली. जळगाव, धुळे, अमरावती... सारखी बदल्यांची बक्षीसं मिळाली. आता तर त्यांना थेट मनोरुग्णच ठरवलं जातंय. त्यामागेही राजकारण होतंय.क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून 2001 मध्ये त्यांनी निम्न तापी प्रकल्पाच्या निकृष्ट बांधकामाचा अहवाल दिला तेव्हा तापी महामंडळानं शासनाला पाठवेल्या पत्रात लिहीलं की पांढरेंचे मानसिक संतुलन बरोबर नाही, त्यांच्या अहवालाकडे लक्ष देऊ नये.धरणांच्या निकृष्ट बांधकामाचा खरा अहवाल देणारा सरकारी अधिकारी मनोरुग्ण आणि ते अहवाल दडपणारे पुढारी शहाणे यामागचं राजकारण ओळखू न येणारी महाराष्ट्रातली जनता खुळी राहिलेली नाही. सरकारी अधिकार्‍यांना ज्या राजकीय दबावाखील काम करावं लागतं त्या अस्वस्थतेची कोंडी पांढरेंनी फोडली. आता कसोटी आहे सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांची... गप्प बसायचं की पांढरेंना पाठिंबा द्यायचा याची..विजय पांढरे म्हणतात, अधिकारी, आयएस, आयपीएस, कर्मचारी यांना मला सांगायचंय. आपण जागण्याची गरज आहे. आपण बेहोश झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली. जागे व्हा... परिस्थिती बदललेल..आणि आता ती बदलायचा सुरुवात झाली.पांढरे तर निमित्त ठरलेत... आता वेळ आहे ती इतरांची...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close