S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मी मनोरुग्ण होतो तर मला बढती कशी दिली ?-पांढरे (भाग 2)
  • मी मनोरुग्ण होतो तर मला बढती कशी दिली ?-पांढरे (भाग 2)

    Published On: Sep 27, 2012 04:50 PM IST | Updated On: Sep 27, 2012 04:50 PM IST

    27 सप्टेंबरमहाराष्ट्राचं 'वॉटरगेट' उघडकीस आणणारे मेरीचे चीफ इंजीनिअर विजय पांढरे यांनी सर्वात प्रथम आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत विजय पांढरे यांनी आपल्यासोबत सिंचन खात्याने केलेल्या व्यवहाराचा पाढाचं वाचून दाखवला. सिंचन घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही पांढरेंनी केली. तसेच मी मनोरुग्ण होतो तर मला बढती कशी दिली ? असा संतप्त सवाल पांढरे यांनी थेट सरकारला विचारला आहे. मला मनोरूग्ण ठरवलं होतं तर मानसिक चाचणी का नाही केली ? मुळात सरकारची स्पष्टीकरण मागण्याचीही हिंमत झाली नाही. उलट माझी बदनामी करण्यासाठी अभियंता एम.के. कुलकणीर्ंवर काही अभियंत्यांनी दबाव आणला त्यामुळे माझ्यावर असे आरोप झाले. माझे सर्व गोपनीय अहवाल उत्कृष्टच होते. मी वरिष्ठांकडे अहवाल पाठवला पण वरिष्ठही कारवाई करत नव्हते म्हणून मला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागलं. जनतेच्या पैशाची खुलेआम होतं असलेली लूट थांबलीच पाहिजे असा निर्धार केला. सर्वात धक्कादायक म्हणजे मोठमोठे टेंडर्स काढून पैसा लाटण्यासाठीच योजना राबवल्या जातात असा आरोपही पांढरेंनी केला. मी मनोरुग्ण होतो तर मला बढती कशी दिली ?-पांढरे (भाग 1)

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close