S M L
  • औरंगाबादमध्ये बाप्पाला निरोप

    Published On: Sep 29, 2012 12:38 PM IST | Updated On: Sep 29, 2012 12:38 PM IST

    29 सप्टेंबरऔरंगाबादमधील संस्थान गणपतीची आज सकाळपासून मिरवणूक निघाली. गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. शहरातील प्रतिष्ठीत नागरीक या मिरवणुकीत आहेत. 65 वर्षापासूनच्या ऐतिहासिक शेव्हरलेट या गाडीतून ही बाप्पाची मिरवणूक विसर्जनासाठी निघाली. तर औरंगाबादचे ग्रामदैवत असलेल्या गणेशमुर्तीची अतिशय पारंपारीक पद्धतीनं मिरवणूक निघाली दरवर्षी सनई चौघड्याच्या नादासह बैलगाडीतून या बाप्पांची मिरवणूक निघते. अबालवृद्ध मोठ्या उत्साहानं या मिरवणुकीत सहभागी होऊन मानाच्या गणपतीला निरोप देताहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close