S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मी इमेज जपण्यापेक्षा कामांना प्राधान्य देतो -अजित पवार
  • मी इमेज जपण्यापेक्षा कामांना प्राधान्य देतो -अजित पवार

    Published On: Oct 1, 2012 12:57 PM IST | Updated On: Oct 1, 2012 12:57 PM IST

    01 ऑक्टोबरमी इमेजपेक्षा जनतेच्या कामांना प्राधान्य देतो या शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला. आज सातार्‍यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती मेळाव्यात सहभागी झालेत. त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ही टीका केली. काहीजण फाईल्स मुद्दाम का अडकवून ठेवतात, असा खोचक सवाल विचारत त्यांनी आपला रोख मुख्यमंत्र्यांकडे असल्याचेही संकेत दिलेत. तसेच सरकारनं सिंचनावरची श्वेतपत्रिका लवकरत काढावी, असंही त्यांनी पुन्हा म्हटलंय. मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी आपल्याला पत्र पाठवलं असतं तर चौकशी केली असती असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. सातार्‍यात आज राष्ट्रवादीने अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची मोठी मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन केलंय. युवती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अजित पवार आणि सुप्रीया सुळे एकाच व्यासपीठावर आले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close