S M L
  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी कैद

    Published On: Oct 4, 2012 11:00 AM IST | Updated On: Oct 4, 2012 11:00 AM IST

    04 ऑक्टोबरमुंबईतल्या सीएसटी रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात गुन्हा कैद झाला आहे. एका सुटकेसमध्ये 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना 26 सप्टेंबरला घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता धक्कादायक प्रकार उघड झाला. या फुटेजमध्ये दोन तरुण मोठ्या शिताफीने स्टेशनवर सुटकेस ठेवून पसारा झाले. हे फुटेज रेल्वे पोलिसांनी जारी केलंय. पोलिसांनी याप्रकरणी जवळपास 300 जणांची चौकशी केली. पण अजून कोणताही सुगावा लागलेला नाहीय. मृत महिलेचीही अजून ओळख पटलेली नाही. सीसीटीव्ही फूटेजमधले दोघे संशयित पुण्याहून सिंहगड एक्सप्रेसनं आले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close