S M L
  • नवरात्रीसाठी नक्षीदार घटांना मागणी

    Published On: Oct 13, 2012 11:21 AM IST | Updated On: Oct 13, 2012 11:21 AM IST

    13 ऑक्टोबरनाशिकच्या गंगाघाटावर नवरात्रीसाठी आकर्षक घट तयार केले जात आहेत. अत्यंत सुबक कलाकुसर आणि मोहक नक्षीकाम केलेल्या या घटांना विशेष मागणी असते. यंदाही हे घट 50 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. घटावरचं रंगकाम आणि कलाकुसर यावर ही किंमत ठरवली जाते. काही ठिकाणी या घटात दिवे लावून त्याभोवती गरब्याचा फेर धरला जातो तर काहीजण या घटांचा घटस्थापनेसाठी वापर करतात. अत्यंत आकर्षक दिसत असलं तरी तितकीच किचकट कलाकुसर असल्यानं एके का घटांसाठी कलाकारांना एकेक दिवसही लागतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close