S M L
  • गडकरींच्या 'उद्योगा'चा आणखी एक गौप्यस्फोट

    Published On: Oct 18, 2012 05:07 PM IST | Updated On: Oct 18, 2012 05:07 PM IST

    18 ऑक्टोबरनितीन गडकरी यांच्या पूर्ती संस्थेला गजानन घाडगे यांची जमीन अजित पवार यांनी दिली असा गौप्यस्फोट काल इंडिया अगेन्स्ट करप्शनने केला होता. पण, आज आयबीएन लोकमतची हाती 'गडकरी लँड' गौप्यस्फोट करणार व्हिडिओ हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये स्वत: गजानन घाडगे धक्कादायक खुलासा केला आहे. धरणांच्या सुशोभिकरण करण्यासाठीचे कारण देऊन गजानन घाटगे यांची 100 एकर जमीन कवडीमोल भावाने घेऊन ती 'गडकरींच्या साम्राज्या'साठी देण्यात आली. या जमिनीचा मोबद्दल म्हणून त्यांना फक्त 5 लाख रुपये देण्यात आली. ज्या ठिकाणी धरणं बांधण्यात आलं आहे त्याच धरणाला लागून गडकरींचा वीज प्रकल्प उभारण्यात आला आहे. याच प्रकल्पाला लागून उसाच्या मळीपासून दारु तयार केली जात होती. याच दारू भट्टीतून सांडपाणी हे नदीत सोडले जाते. आणि हेच पाणी येथील स्थानिक रहिवासी पिण्यासाठी वापरतात. एव्हान एवढेच नाही जी जमीन बळकावण्यात आली त्या शेतीवर शेती केली जात होती. पूर्त्तीच्या ताब्यात ही जमीन आल्यावर त्यावरही शेती केली जात होती. मात्र गुरुवारी गडकरी यांनी ही जमीन पडीक असल्याचा दावा केला होता. पण आता गजानन घाडगे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे गडकरींचा दावा पुर्णपणे खोटा ठरला आहे. 13 ऑक्टोबरला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि त्यांची टीम जिथं जिथं फिरली तिथं तिथं पुराव्यादाखल त्यांनी हे व्हिडिओ शूटींग केलंय. धावत्या स्वरुपात हे शूटींग करण्यात आलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close