S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • विद्यार्थीनींशी लैंगिक चाळे करणार्‍या शिक्षकाला चोपले
  • विद्यार्थीनींशी लैंगिक चाळे करणार्‍या शिक्षकाला चोपले

    Published On: Oct 22, 2012 11:06 AM IST | Updated On: Oct 22, 2012 11:06 AM IST

    22 ऑक्टोबरशिक्षकांच्या नावाला काळिमा फासणार्‍या एका शिक्षकाला कोल्हापुरमध्ये चांगलाच धडा शिकवण्यात आला. या लिंगपिसाट शिक्षकाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. शहरातल्या उत्तरेश्वर पेठेतल्या राजमाता जिजाऊ शाळेत ही घटना घडली. राजाराम जाधव असं या शिक्षकाचं नाव आहे. हा शिक्षक 2008 सालापासून अनेक विद्यार्थीनींशी लैंगिक चाळे करायचा. त्याबाबत पालकांनीही शाळेकडे तक्रार दिली होती. तरीही शाळेनं त्याच्यावर कोणतीच कारवाई न केल्यानं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे या शिक्षकाला गाठलं. त्यानंतर त्याला त्याच्या कृत्याबद्दल जाब विचारल्यावर त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या गैरकृत्यांचे पुरावे देत शाळेच्या मुख्याध्यापकांनाही चांगलंच फैलावर घेतलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close