S M L
  • मराठा आरक्षणासाठी रामदास आठवलेंचा पुढाकार

    Published On: Oct 30, 2012 03:33 PM IST | Updated On: Oct 30, 2012 03:33 PM IST

    30 ऑक्टोबरदलित आणि मराठा खांद्याला खांदा देऊन लढण्यासाठी तयार आहोत अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी दिली. रिपाईच्या मराठा आघाडीतर्फे आज मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदिरात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या परिषदेला वनमंत्री पतंगराव कदम, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्यासह विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते. मराठा समाजातल्याआर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाला नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण द्यावं या मागणीसाठी गेली काही वर्ष मराठा संघटना प्रयत्नशील आहेत. सध्या महाराष्ट्रात विविध घटकांसाठी एकूण 52 टक्के आरक्षण आहे. तर इतर राज्यात सामाजिक आरक्षणाची टक्केवारी जवळपास 70 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण द्या या मागणीसाठी मराठा संघटनांनी वारंवार आंदोलनं पुकारली आहे. आता रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close