S M L
  • बाळासाहेबांची तब्येत ठीक आहे -उद्धव

    Published On: Nov 2, 2012 11:05 AM IST | Updated On: Nov 2, 2012 11:05 AM IST

    02 नोव्हेंबरबाळासाहेबांवर उपचार सुरू असून तब्येतीची काळजी घेतली जातेय त्यांची तब्येत ठीक आहे असं आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. आज शिवसेना भवनात सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. पण या बैठकीचा बाळासाहेबांच्या तब्येताशी काहीही संबंध नसल्याचंही ते म्हणाले आजची बैठक ही पूर्वनियोजित होती. बाळासाहेबांची तब्येत थोडीशी खालावली असल्याची माहिती आयबीएन लोकमतला मिळालीय. बाळासाहेब आजारी असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याने बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close