S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मराठवाड्याच्या पाण्यासाठी खैरे-दानवे यांच्यात जुंपली
  • मराठवाड्याच्या पाण्यासाठी खैरे-दानवे यांच्यात जुंपली

    Published On: Nov 5, 2012 01:14 PM IST | Updated On: Nov 5, 2012 01:14 PM IST

    05 नोव्हेंबरमराठवाडयाला हक्काचं पाणी द्यावं या मागणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या औरंगाबादच्या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातला. एवढंच नाही तर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यात चांगलीच जुंपली. यामध्ये खासदार खैरे यांनी दानवे यांना धक्काबुक्कीही झाली.आज मराठवाड्याला पाणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. या बैठकीला राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात हे जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवून घेराव घातला. शिवसैनिकांचा घेराव तोडून कसेबसे महसूलमंत्री बैठकीत पोहचले पण बैठकीमध्येही शिवसैनिकांनी येऊन गोंधळ घातला. यामध्ये जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना मारही लागला. याचवेळी शिवसेनेतील धुसफुस आणि गटबाजीही पाहायला मिळाली. अंबादास दानवे हे या आंदोलनाचं नेतृत्त्व करीत होते. मात्र पालकमंत्र्यांना अडवत असताना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे मात्र पालकमंत्र्यांच्या बाजूने होते. पालकमंत्र्यांना घेराव घालू नये आणि त्यांना अडवु नये म्हणून चक्क खैरे आणि दानवे यांच्यामध्येच जुंपली. यावेळी खासदार खैरे यांनी दानवे यांना धक्काबुक्कीही झाली. मात्र दोनं नेत्यांच्या भांडणानंतरही महसूलमंत्र्यांनी आपली बैठक पार पाडली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close