S M L
  • बराक ओबामा यांचा जीवन प्रवास

    Published On: Nov 7, 2012 11:29 AM IST | Updated On: Nov 7, 2012 11:29 AM IST

    07 नोव्हेंबरते शेवतवर्णीय नाहीत.. आणि त्यांचे वडीलसुद्धा अमेरिकन नव्हते. चार वर्षांपूर्वी ते सिनेटरही नव्हते. ओबामांचं बालपण मागासलेल्या भागात गेलं. अशी पार्श्वभूमी असताना ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीपर्यंत धडक मारतील यावर कुणाचा विश्वास बसणं कठीण होतं. पण, त्यांनी जेव्हा प्रचार मोहिम सुरू केली. त्यावेळी ते लोकप्रिय ठरले. बराक ओबामा म्हणतात, अमेरिका आम्ही माघारी जाऊ शकत नाही. अनुभवी आणि मोठ्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. हवाईमध्ये 1961 साली ओबामा यांचा जन्म झाला. त्यांची आई अमेरिकन तर वडील केनियन. ओबामा दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईवडलांनी डिव्होर्स घेतला. त्यानंतर वडील केनियाला परतले. आईनं पुन्हा लग्न केलं. ओबामांनी आपल्या वडिलांना फक्त एकदाच पाहिलं. त्यावेळी ते 21 वर्षांचे होते. श्वेतवर्णीय आजीआजोबांनी त्यांचं पालनपोषण केलं. सँडी न्यूमन म्हणतात, त्यांना सोपा मार्ग सहज निवडता आला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे. 1985 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर ते सार्वजनिक कार्यात उतरले. शिकागोमधल्या कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी त्यांनी कार्य केलं. ओबामा यांनी 1996 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. पण, त्यांची खर्‍या अर्थानं दखल घेतली गेली 2004 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात... वयाच्या 44 वर्षी ते तिसरे आफ्रिकन-अमेरिकन सिनेटर बनले. आशा आणि परिवर्तनाचा नारा देत त्यांनी तरुण मतदारांना आकर्षित केलं. आणि आज 45 व्या राष्ट्रध्यक्षपदाचा बहुमान पटकावला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close