S M L
  • महालक्ष्मी मंदिरात आजपासून किरणोत्सव

    Published On: Nov 9, 2012 04:19 PM IST | Updated On: Nov 9, 2012 04:19 PM IST

    09 नोव्हेंबरप्राचीन वास्तुकौशल्याचा अद्भुत नमुना असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी सुर्याची किरणं महालक्ष्मीच्या चरणापर्यंत येऊन पोहचली. संध्याकाळी सहा वाजून 1 मिनीटांनी ही सूर्यकिरणं गरुड मंडपातून गाभार्‍यात पोहचली आणि त्यानंतर महालक्ष्मीच्या चरणाजवळ येऊन लुप्तं झाली. हा सोहळा अनुभविण्यासाठी भक्तांनी महालक्ष्मी मंदिरात मोठी गर्दी केली होती. 9 ते 11 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी 1 आणि 2 फेब्रुवारी असे वर्षातील सहा दिवस हा किरणोत्सवाचा सोहळा महालक्ष्मीमंदिरात पहायला मिळतो. त्यामुळे या काळात भक्त मोठ्या संख्येनं हा सोहळा पाहाण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात हजर रहातात.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close