S M L
  • 'कोट्यावधी रुपये गायब होणं ही अजब जादू -राज

    Published On: Nov 10, 2012 03:32 PM IST | Updated On: Nov 10, 2012 03:32 PM IST

    10 नोव्हेंबरसध्या महाराष्ट्रात वेगवेगळे जादूचे प्रयोग सुरू असून 90-90 कोटी रूपये कुठे गायब होतात ते कळतच नाही. पैसे जातात धरणं दिसत नाही. कुठे कोणतेही प्रकल्प दिसत नाही ही वेगळ्या प्रकारची जादूच आहे अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यावर मार्मिक भाष्य केलंय. तसेच या गोष्टी शिकायला राजकारणात यावं लागतं खूप तपर्श्या लागते. पण असले घोटाळ्याचे प्रयोग करणारी ऍकडमी दुसरी कोठे ही नाही असा टोला राष्ट्रवादी पक्षाचे नाव न घेता राज यांनी लगावला तसेच असला कार्यभाग आणि अशा जादूच्या गोष्टी लोकांसमोर उलगडून दाखवू असा इशाराही राज यांनी दिला. दादर इथे शनिवारी एका मॅजिक ऍकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी राज ठाकरे बोलतं होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close