S M L
  • बदलापुरात रिक्षाचालकांना मिळाला बोनस

    Published On: Nov 10, 2012 03:50 PM IST | Updated On: Nov 10, 2012 03:50 PM IST

    10 नोव्हेंबरदिवाळी आणि बोनस हे जुनंच समीकरण..पण बदलापुरात तो चर्चेचा विषय बनलाय तो निराळ्याच कारणानं. कारण शहरात चक्क रिक्षा चालकांनाही बोनस मिळाला आहे. रिक्षा संघटनेच्या वतीनं तब्बल 250 रिक्षा चालकांना तब्बल साडेनऊ लाखांच्या बोनसचं वाटप करण्यात आला आहे. बोनस काय चाकरमान्यांचा मिळतो ही प्रथाच रिक्षाचालकांनी खोडून काढली आहे. रोजच्या मिळकतीतून रिक्षा चालकांनी थोडे थोडे पैसे बाजूला ठेवले. वर्षभरात ही रक्कम तब्बल साडेनऊ लाख जमा झाली. आज रिक्षाचालक संघटनेनं मोठ्या अभिमानाने 250 रिक्षाचालकांनी बोनस वाटप केला. रिक्षाचालकांची ही योजना पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला. बदलापूर परिसरातील इतर रिक्षाचालकांनी आता पैसा बाजू काढण्याची भीष्मप्रतिज्ञा केली आहे. मेहनती रिक्षा चालकांच्या या योजनेचं नागरिकांनी कौतुक केलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close